Type Here to Get Search Results !

प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान

 पूण्यश्लोक न्युज नेटवर्क..




धाराशिव येथील शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे संचालक तसेच बील गेट्स जुनिअर काॅलेजचे प्राचार्य प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान नुकताच करण्यात आला. 

अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला असून दि. 11 जून 2025 रोजी क्षितिज पॅलेस, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, अमरावती येथे समारंभ पुर्वक मोठ्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातील जनसंपर्क अधिकारी डाॅ. मनिष गवई व कमलताई गवई यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.



प्रा. सोमनाथ लांडगे यांनी

सत्काराला उत्तर देत "मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत पालकांचे योगदान " या विषयावर आपले सविस्तर विचार मांडले. सध्याच्या परिस्थितीत आईवडील जर मुलांच्या शिक्षणातील बारीक सारीक बाबी समजून घेऊन त्यांना सर्व बाजूंनी सोबत राहत मदत करत असतील तर मुले नक्कीच यशस्वी होतील, असे सांगीतले.

प्रदीर्घ व दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यन्यामुर्ती भुषण गवई यांच्या आई कमलताई गवई, पोलीस उपायुक्त गणेशजी शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातील जनसंपर्क अधिकारी डाॅ. मनिष गवई, राष्दवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत डावरे,

 साहित्यिक विष्णुसिंह सोळंकी, प्राचार्य डॉ. दिलीप काळे, अंबाई बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव माधुरी चव्हाण या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास या मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक, पालकांसह अनेक जण उपस्थित होते. 

 यापूर्वी याच वर्षांत पुणे येथे राज्यस्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार प्रा. सोमनाथ लांडगे यांना मिळला असून हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करुन मेडिकल कॉलेज प्रवेश पुर्व परिक्षा अर्थात नीट परीक्षेत आपला नवीन पॅटर्न तयार करून अनेक गोरगरीब व वंचित मुला-मुलींना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी झालेले व धाराशिव शहरात श्री साई श्रध्दा एज्युकेशन मार्फत अत्यंत कमी फीस मध्ये मुलींचे वसतीगृह, अर्थिक अडचणीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींना शैक्षणिक फीस भरण्यास मदत असे अनेक शैक्षणिक करत असलेल्या प्रा. सोमनाथ लांडगे यांना हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments