Type Here to Get Search Results !

नीट स्पर्धा परिक्षेत कु आरोही वारे हिचे घवघवीत यश

कळंब धाराशिव



कळंब:- येथी प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ सत्यप्रेम वारे यांची कन्या  कु आरोही वारे हिने निट स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

 तिला 720 पैकी 518 गुण मिळाले आहेत. ऑल इंडिया रॅंक 33748 असून ओबीसी रॅंक 15701 असा आहे. तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस साठी प्रवेश निश्चित झाला आहे.

तिचे माध्यमिक शिक्षण शारदा इंग्लिश स्कूल केज येथून झाले असून बारावी शाहु कॉलेज मधून पूर्ण केली. 

तिच्या या यशाबद्दल डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ शितल कुंकुलोळ, डॉ शिल्पा ढेंगळे, डॉ अभिजित लोंढे, डॉ सुधीर आवटे, डॉ अभय मनगीरे, डॉ राजेंद्र गोरे, सुरेश भाऊ जंत्रे, टी जे माळी, संतोष घाटूळे, नानासाहेब कवडे, पिंटू लगस्कर इत्यादी नी अभिनंदन करून  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . 

Post a Comment

0 Comments