Type Here to Get Search Results !

धनगर एसटी आरक्षन अंमलबजावणी साठी सरकारने वेळ काढू पणा करु नये. अनिल गोयकर

लातूर :
गेली 70 वर्षापासून धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लढत आहे परंतु स्वातंत्र्यानंतर या देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली, प्रत्येक सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केलेला आहे, राज्यात संख्येने दोन नंबरचा असलेल्या समाजाची मते घेऊन सरकार स्थापन केले जाते, परंतु एकदा कुठलाही पक्ष किंवा राज्यकर्ते खुर्चीवर बसले की पुन्हा धनगर समाजाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाहीत, निवडणुका तोंडावर आल्या की नेहमीप्रमाणे धनगर st आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत खोटे आश्वासने दिले जातात या राज्यकर्त्यांच्या भूलथापान्ना समाज बळी पडतो. मागील काळात 2024 मध्ये 28 जून ते 13 जुलै असे 16 दिवस पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक लातूर या ठिकाणी मल्हार योद्धे अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे या दोघांनी आमरण उपोषण केले होते याचे लोन महाराष्ट्रभर पसरले आणि दुसऱ्या टप्प्यात 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर असे एकूण 20 दिवस उपोषण करण्यात आले होते याचा परिणाम म्हणून लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी आंदोलने उपोषण करण्यात आली याची दखल घेऊन सरकारने स्वतः मुख्यमंत्री यांनी आम्हाला आमंत्रण देऊन मुंबईला बोलून दोन वेळेस बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बोगस धनगर नावाचे सर्टिफिकेट रद्द करण्याचे व धनगराच्या st आरक्षणाचा जीआर काढण्याबाबत शिंदे सरकारने आश्वासन दिले होते, त्यातील एक आश्वासन बोगस सर्टिफिकेट रद्द करण्याबाबत तेव्हाच निवडणुकीपूर्वी ते पूर्ण केले परंतु महत्त्वाचं म्हणजे st आरक्षणाचा जीआर अजून काढलेला नाही त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे, सरकारने समाजाचा संयमाचा अंत पाहू नये, वेळ काढूपणाची भूमिका घेऊ नये नाहीतर आमच्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईसाठी पुन्हा समाजाने नव्या जोमाने आणि उमेदीने तयार राहावे, असे आवाहन मल्हार योद्धे अनिल गोयकर यांनी केले आहे. आपला - आंदोलन उपोषण करता अनिल गोयकर मो. 9881648378

Post a Comment

0 Comments