Type Here to Get Search Results !

गोष्ट छोटी...डोंगरा एवढी ...श्री अनिल भालेकर

पूण्यश्लोक न्यूज अंबड...
मुलाच्या आजारपणावर उपचारार्थ अंबड शहरातील डॉ. पिंगळे सर यांच्या हॉस्पिटल मध्ये जाणे झाले. सकाळची वेळ होती त्यामुळे दवाखान्यात रुग्णांची जास्त रेलचेल नव्हती. रुग्णालयात बराच वेळ लागणार असल्यामुळे वर्तमानपत्र वाचत असताना अंबड शहरातील मत्सोदरी विद्यालयातील सहा सात विद्यार्थिनी डॉक्टर कडे येत बोलताना दिसल्या. एकत्रित सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टरांची चर्चा करत असल्यामुळे माझे लक्ष वेधले गेले. त्या सर्व विद्यार्थिनींना आपापला रक्तगट चेक करायचा होता. शाळेच्या शैक्षणिक माहिती संकलनासाठी त्यांना आपला रक्तगट माहिती शाळेला सादर करायची होती. डॉक्टरांनी लगेच रक्तगट तपासणी करणाऱ्या लॅब चालकांना येण्याबाबत कल्पना दे बुलवून घेतले. रक्तगट तपासणी फीस जमा करताना त्या सर्व विद्यार्थिनींकडे पैसे कमी अधिक असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले. एकमेकींकडे पैशांची मागणी करत रक्तगट तपासणी फीस जमा करण्याचा आटोकात प्रयत्न करत होत्या. कमी अधिक करून त्यांनी तपासणी फीज जमा केली व काही वेळाने परत येण्याचे सूचना डॉक्टरांनी देताच त्या तिथून निघून गेल्या. त्या सर्व विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी करण्यासाठीची फिस जमा करण्याची अडचण पाहून अस्वस्थ झालो. अंबड शहरातील सर्वात मोठी शाळा ही मत्सोदरी विद्यालय असून अंबड शहराबरोबरच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी या शाळेत शिक्षण घेतात. शेतकरी, कष्टकरी,मोल मजूर यांचे बहुतांशी विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का होईना बसणारा आर्थिक फटका आपण थांबून शकतो का? या विचाराने कामाला लागलो आणि मत्सोदरी शाळेच्या मुख्याध्यापकांशी फोन द्वारे याबाबत चर्चा केली. त्यांना सर्व विषय विशद करत शाळेतच रक्त गट तपासणी शिबिर घेण्याबाबत आपण काही करू शकतो का याबाबत मत व्यक्त केले. शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत किंवा खाजगी लॅबच्या माध्यमातून नाममात्र दरात शाळेतच शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक परवड थांबू शकतो याबाबत कल्पना व्यक्त करताच मुख्याध्यापक श्री.अंभोरे सर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत माझ्या मताशी सहमती दर्शवत "उद्याच याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देत बाहेर कुठे हि अधिक पैसे न देता रक्तगट तपासणी न करता शाळेतच आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरात तपासणी करावी." अशी सूचना देतो व संबंधितांशी याबाबत पत्रव्यवहार करत शाळेत शिबिर घेण्याबाबतचे नियोजन करण्याबाबत आश्वासन दिले..! आपल्या एका छोट्याशा कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक परवड थांबवण्यात यशस्वी झालो याचे आत्मिक समाधान काही वेगळेच...! *जय हिंद जय भारत* *मल्हारश्री अनिल भालेकर* *सहशिक्षक,प्रेस रिपोर्टर*

Post a Comment

0 Comments