Type Here to Get Search Results !

थोर क्रांतिकारक संगोळी रायन्ना ,लेखक पवण थोटे..

  पूण्यश्लोक न्यूज..



 थोर क्रांतिकारक  संगोळी रायन्ना  हे एक भारतीय लष्करी नेते होते.त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील सांगोली येथे झाला.त्यांचे वडील भरमप्पा रोगन्नावर होते. त्यांची आई केंचवा होती.१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी रियासत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कित्तूर चेन्नम्माच्या कित्तूरच्या सैन्यात त्यांनी वरिष्ठ कमांडर म्हणून काम केले.१८२४ मध्ये ईआयसीच्या कुप्रसिद्ध डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सला प्रतिसाद म्हणून चेन्नम्माने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी) विरुद्ध अयशस्वी बंडाचे नेतृत्व केल्यानंतर,रायण्णा भारतात कंपनीच्या राजवटीचा प्रतिकार करत राहिले.ईआयसी अधिकाराविरुद्ध आणखी एक उठाव केल्यानंतर, त्यांना अखेर ब्रिटिशांनी पकडले आणि १८३१ मध्ये फाशी देऊन मृत्युदंड देण्यात आला.भारतीय स्वातंत्र्यात त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने, त्यांचा स्मारक पुतळा बेळगावातील सांगोली गावात बांधण्यात आला.

थोर क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी झाला संगोळी रायन्ना हे स्वातंत्र्यपूर्व कित्तूर संस्थानचे सेनापती आणि भारतातील स्वातंत्र्यसेनानी होते.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटिशांशी निकराची झुंज दिली.त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी कित्तूर (कर्नाटक) मधील संगोळी या छोट्या गावात एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला.लहानपणापासूनच संगोळी रायन्ना हे काटक आणि धाडसी होते. याच गुणांचा फायदा त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढताना झाला.

कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा.तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होता.त्यांना एक मुलगा होता.परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले.त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले.परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली.परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले.हेच ते कित्तुरचे युद्ध.या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटिशांशी लढली.यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायण्णा. संगोळी रायण्णानेही पराक्रमाची शर्थ केली.परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बैलहोंगलच्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.त्यानंतर मात्र संगोळी रायण्णाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली.त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे,ब्रिटिशांचा खजिना लुटणे,जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायण्णाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले.परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत.अखेर दगा करूनच ब्रिटिशांनी संगोळी रायण्णा यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता.जेव्हा संगोळी रायण्णा यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेऊन ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायण्णा खरोखर थोर क्रांतिकारक होते.संगोळी रायण्णा हे ब्रिटिशकालीन भारतातले एक महान योद्धा होते.ते कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचे सेनापती होते.संगोळी रायण्णा यांनी स्थानिक तरुणांना एकत्र करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात युद्ध पुकारले.त्यासाठी त्यांनी गनिमी काव्याचा मार्ग निवडला. रायण्णाचे सैनिक ब्रिटिशांची कार्यालये जाळत असत,ब्रिटिश सैन्यावर हल्ला करत असत आणि ब्रिटिशांचे खजिने लुटत असत.ब्रिटिश सैन्य रायण्णाचा पराभव करू शकले नाही.त्यामुळे ब्रिटिशांनी रायण्णा यांना फितुरांच्या मदतीने पकडले.रायण्णा यांच्यावर खटला दाखल केला,फाशीची शिक्षा सुनावली आणि त्यानुसार त्यांना झाडाला लटकावून फाशी दिली.

संगोळी रायण्णा ब्रिटिशांच्या विरोधात संघटितपणे लढणारे पहिले योद्धा होते.१८५७ च्या युद्धाच्या कित्येक वर्षे अगोदर रायण्णा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध केले.

संगोळी रायण्णा यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन यात एक आश्चर्यकारक योगायोग आहे ! तो म्हणजे रायण्णा यांचा जन्म १५ ऑगस्ट रोजी झाला तर मृत्यू २६ जानेवारी रोजी झाला! इथे आगळावेगळा योगायोग हा आहे की संगोळी रायण्णा यांच्या जयंतीला भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले,तर पुण्यतिथीला भारत प्रजासत्ताक झाला!

संगोळी रायन्ना यांच्या जीवनावर आधारीत क्रांतिवीर संगोळी रायण्णा हा कन्नड सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता.या सिनेमात संगोळी रायन्ना यांची भूमिका दर्शन या अभिनेत्याने साकारली होती,तर राणी चेन्नम्मा यांची भूमिका जया प्रद या अभिनेत्रीने साकारली होती.अश्या या थोर क्रांतिकारक संगोळी रायन्ना यांच्या जयंती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.


पवन थोटे,यवतमाळ 

९४०४५२६७७७

Post a Comment

0 Comments