बाजीराव चौरे सहसंपादक
अहिल्या नगर..
जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी श्री क्षेत्र चोंडी येथील स्मृतीस्थळाचे जतन, संवर्धन व सर्वांगीण विकास आराखड्यासाठी शासनाने आज अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या प्रशासकीय मान्यतेअंतर्गत एकूण ₹६८१ कोटी ३२ लक्ष रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
श्री क्षेत्र चोंडी येथे ६ मे २०२५ रोजी आयोजित विशेष मंत्री परिषद बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यानुसार आज रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.

Post a Comment
0 Comments