Type Here to Get Search Results !

नवस फेडण्यासाठी आ. पडळकर मुरुड येथे दाखल


 

पूण्यश्लोक न्युज नेटवर्क ..

 लातूर..

 लातूर जिल्हयातील मुरूड येथे बलभीम जाडकर महाराजांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी व . महाराजांनी केलेला नवस माझ्यासाठी 'जोपर्यंत जनतेतून निवडून येत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही,' असा नवस केल्याचं ऐकून मन निशब्द झालं होतं. आज त्या नवसपूर्तीनंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना त्यांच्या भक्तीमुळे आणि विश्वासामुळे आपली जबाबदारी किती मोठी आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.


जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनातील आपुलकी आणि आदर यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढते. असे गौरवोद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले यावेळी महाराजांचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले . या वेळी शिवदास बिडगर, माऊली हळणवर, सुभाष मस्के सर, बालाजी बेकरे सर झेलम शिंपले आणि सर्व मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments