..पूण्यश्लोक न्युज नेटवर्क...
सभापती राम शिंदे यांनी भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु जी यांची आज राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ३१ मे रोजी श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे विशेष उपस्थित राहण्याचे निमंत्रण सादर केले.
यावेळी भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ.उज्वलाताई हाके, सांगली मिरज महानगरपालिकेच्या माजी महापौर श्रीमती संगिताताई खोत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महिला बालकल्याण सभापती श्रीमती मोनिकाताई महारणवर, पिंपरी चिंचवड महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती वीणाताई सोलवणकर, मुंबई शहर डॉक्टर सेल अध्यक्षा श्रीमती डॉ.स्मिताताई काळे आदी उपस्थित होत्या



Post a Comment
0 Comments