Type Here to Get Search Results !

प्रत्येक माणसाला किंमत आहे,फक्त योग्य ठिकाणी पोहोचणे आवश्यक

 


या जगात प्रत्येक माणसाला किंमत आहे,मग तो कोणत्याही परिस्थितीत असो,कोणत्याही परिस्थितीत वाढलेला असो. फक्त त्याला आपल्या योग्य जागेची ओळख व्हावी लागते.

          *माणसाची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार नसते,तर तो कुठे आहे आणि त्याला कुठे वाव मिळतो यावर अवलंबून असते.*


जर आपण एखाद्या पाण्याच्या थेंबाचा विचार केला,तर त्याचे अस्तित्व कुठे पडतो यावर अवलंबून असते.गरम तव्यावर पडला तर तो वाफ बनून नाहीसा होतो,

चिखलात पडला तर चिखलाचा एक भाग बनतो,पण जर तोचं थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो चमकदार दवबिंदू ठरतो. एवढंच नव्हे,तर तोच थेंब शिंपल्यात गेला,तर त्याचे रूपांतर मोत्यात होते.

*थेंब तोच आहे,पण ज्या जागी तो पडला त्यावर त्याचे अस्तित्व आणि मूल्य ठरते.*


यशस्वी होण्यासाठी योग्य ठिकाणी पोहोचणे गरजेचे असते.

जीवनातही हेचं लागू होते. माणसाने आपल्या योग्य जागेचा शोध घेतला पाहिजे,जिथे त्याला त्याच्या गुणवत्तेची योग्य किंमत मिळेल.


अगदी बुद्धिबळाच्या खेळातही योग्य वेळी योग्य चाल महत्त्वाची असते,मग तो राजा असो किंवा (सैन्य)प्यादा.प्रत्येकाला आपले स्थान बदलावे लागते,*कारण योग्य ठिकाणी पोहोचल्याशिवाय बाजीराव चौरे यांच्या लेखणीतून ,

आपली किंमत ठरत नाही 




गावात बाईमाणसांच्या हाताला काम नसते,पण शहरात मात्र कामासाठी बाईमाणूस मिळत नाही!कुठे घर सोडावे लागते, कुठे गाव सोडावे लागते,तर कुठे संपूर्ण देशही!

*गुण,कौशल्य आणि मेहनत असली तरी योग्य ठिकाणी पोहोचल्याशिवाय त्याला योग्य न्याय मिळत नाही.*


योग्य संधी मिळाल्यावर जीवन बदलते याचे उदाहरण म्हणजे,

माझ्या कॉलेजमधील एक मित्र अभ्यासात फारसा चांगला नव्हता.गावात त्याच्या हाताला चांगले काम मिळाले नसते,पण त्याने दुबई गाठली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. भक्कम पगाराची नोकरी त्याला मिळाली,जीवनाचा दर्जा बदलला.*त्याच्या कौशल्याला जिथे किंमत मिळाली,तिथे पोहोचल्यावरच त्याचे आयुष्य बदलले.*


मी ज्या आस्थापनेत काम करतो त्यातील एका उपविभागाची परिस्थिती अतिशय गंभीर. प्रत्येक कामासाठी तेथील अधिकारी यांना जबाबदार धरून कारवाई का करू नये म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीसेस दिली जात होती,कारवाई केली जात होती.नंतर काही महिन्यांनी त्यांची बदली झाली आणि अगदी पहिल्या महिन्यापासून “बेस्ट एम्प्लॉई फॉर द मंथ” अवार्ड त्यांना मिळत गेला. 

*माणूस तोच फक्त जागा बदलली आणि माणसाची किंमत बदलली.*


विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये मक्याचे भाजलेल्या कणसाला १५०० रुपये दर मिळतो तर आमच्याकडे रस्त्यावर अगदी २०-३० रुपयामध्ये मिळते.

अर्थशास्त्रातही "जागेचा सिद्धांत" (Theory of Location) हा एखाद्या वस्तूला किंवा सेवेला मिळणाऱ्या किंमतीवर प्रभाव टाकतो.

आज आपण बघतो की राजस्थानी आणि बिहारी लोक संपूर्ण भारतभर पसरलेले आहेत.

*एका छोट्या गावी जन्मलेल्या बिकानेरी लोकांनी आपली मिठाई विक्रीची कला ओळखली आणि संपूर्ण भारतात ‘बिकानेर स्वीट मार्ट’ नावारूपाला आले.*


बिहारमधील लोकांची मेहनत पाहून देशभरातील बांधकाम, हॉटेल व्यवसायात त्यांचा प्रभाव दिसतो.त्यांनी आपल्या कौशल्यासाठी योग्य जागा निवडली आणि त्यामुळे त्यांची किंमत ठरली.


यावरून हे स्पष्ट होते की, *कोणतीही व्यक्ती जन्मतः मोठी नसते,पण ती योग्य ठिकाणी पोहोचल्यावर मोठी होते.


म्हणूनच कुणीही निराश होऊ नये,कारण आपली किंमत कुठे तरी नक्की आहे—फक्त ती ओळखून तिथे पोहोचणे गरजेचे आहे.

*जीवन हा प्रवास आहे आणि तो योग्य दिशेने केला तर यश निश्चित मिळते.*


शेवटी काय...?

तुमच्या कौशल्याला,मेहनतीला आणि गुणवत्तेला योग्य संधी मिळवून द्या.योग्य ठिकाणी पोहोचल्यावर तुमची किंमत निश्चितचं वाढेल.

*कारण दिव्याचा प्रकाश अंधारात अधिक ठळक दिसतो.योग्य जागा मिळाली की,प्रत्येकाचा प्रकाश झगमगाट करतो!

 लेखक .बाजीराव चौरे सहसंपादक पूण्यश्लोक न्युज .मो नं+91 96046 60335

Post a Comment

0 Comments