Type Here to Get Search Results !

नीट स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

पूण्यश्लोक न्युज धाराशिव,,




कळंब:- नीट - २०२५ स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस अभ्यासक्रमा साठी प्रवेश निश्चित केल्या बद्दल अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई च्या वतीने कु आरोही सत्यप्रेम वारे (५१८ ) आणि शुभम फुलचंद चादर (५०१ ) यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्टेथोस्कोप देऊन गौरवण्यात आले व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी प्रबोधन मंचाचे डॉ रामकृष्ण लोंढे, तालुका अध्यक्ष संतोष घाटूळे, नानासाहेब कवडे, आप्पासाहेब कसपटे, अशोक शिंपले, डॉ सत्यप्रेम वारे, सौ अनुसया वारे, फुलचंद चादर,डॉ अभिजित लोंढे, आप्पासाहेब वाघमोडे, सचिन सलगर, सुनील पाटील,  ई उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments