प्रशांत आडसुळे यांना डॉ ए.पी.जे.अब्दूल कलाम राष्ट्रिय पुरस्कार जाहीर..
July 02, 2025
0
प्रतिनिधी (लोहारा )
प्रशांत अडसुळे यांना भारतरत्न डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम राष्ट्र
सामान्य परिस्थितीवर मात करत सामजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्य करणारे आदर्श समाज सेवक प्रशांत अडसुळे यांना " भारतरत्न डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन - २०२५ चा जाहिर करण्यात आला आहे . हा सन्मान ए .डी .फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे विशेष समारंभात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते प्रशांत अडसुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे .
सामजिक क्षेत्रात निस्वार्थी , प्रामाणिक पणाने गेल्या ११ वर्षे पासून विविध क्षेत्रात उल्लखनीय सातत्याने सामाजिक कार्य सुरु त्याच बरोबर लेखन, समाजप्रबोधन हे राज्य स्तरावरील सामाजिक संघटन , शैक्षणिक, क्रीडा , आरोग्य , ग्रामीण भागातील महिलांना मोफत प्रशिक्षण अशा विविध घटकामध्ये कार्य सुरु आहे . स्वातंत्र्य , स्वालंबन , संघटन या तत्वावर कार्य प्रमाणिक , निस्वार्थी पणाने सुरू
प्रशांत अडसुळे यांनी सामाजिक कार्यातून ज्या प्रकारे समाज संघटन , समाजप्रबोधन , स्वावलंबी पिढी युवकामध्ये सकारात्मकता रुजवण्याचे कार्य करीत आहे . प्रशांत अडसुळे यांना राज्यातून त्यांच्या कार्याला समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या कार्याची निष्ठा , सदभावना , समर्पण आणि संवेदनशीलता पाहाता त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार निश्चित च गावचा , जिल्ह्याचा समाजासाठी गौरस्पद आहे त्यांच्या या खडतर प्रवासतून संघर्षातून मिळालेल्या यशामुळे मित्र मंडळी , नातेवाईक , समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन , कौतुक होत आहे . हा पुस्कार प्रेरणा देते मात्र प्रशांत अडसुळे यांचा प्रवास खडतर , संघर्षमय , वेदनादायी असून यावर मात करत राष्ट्रस्तरापर्यंत आपल्या कार्याचा , व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेला आहे . याचा सार्थ अभिमान आमच्या टीम कडून प्रशांत अडसुळे यांना खूप साऱ्या शुभेच्छा .क

Post a Comment
0 Comments