Type Here to Get Search Results !

मेंढपाळांच्या विविध समस्येवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली पशुसंवर्धन मंत्री यांची भेट,

पूण्यश्लोक न्यूज संपादकीय
विधान भवन मुंबई येथे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा.ना. श्रीमती पंकजा मुंडे यांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या विषयावर झाली चर्चा शेळ्या-मेंढ्यांवर येणाऱ्या रोगांविरोधात लसीकरण मोहिम मेंढपाळ गटांना शासनाच्या योजना आणि अनुदानाचा लाभ मेंढपाळांना ओळखपत्र (ID कार्ड) देणे फिरणाऱ्या मेंढपाळांसाठी तंबू व सोलर दिव्यांची सुविधा DPC फंडातून आवश्यक उपाययोजना पूणे येथे मेंढपाळांसाठी स्वतंत्र आयुक्त कार्यालय स्थापन करण्याची मागणी मेंढपाळांसाठी ट्रॅक्टरसारख्या अत्यावश्यक साधनांची सोय ही बैठक म्हणजे मेंढपाळ समाजाच्या उन्नतीसाठी एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. “शेती व मेंढपाळ मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध” या संकल्पनेला चालना देणारे हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.

Post a Comment

0 Comments