Type Here to Get Search Results !

धाराशिव येथे नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांचा प्रबोधन मंचच्या वतीने सत्कार

पूण्यश्लोक न्यूज....




धाराशिव (प्रतिनिधी) –




 धाराशिव जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच, धाराशिव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यामध्ये उपजिल्हाधिकारी पदी नुकतेच रुजू झालेले श्री पुरुषोत्तम कोकरे व जिल्हा कोषागार अधिकारी पदी नियुक्त झालेले श्री दत्तात्रेय रणसिंग यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.


या प्रसंगी मंचाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे, जिल्हा सचिव प्रा. मनोज डोलारे, मेडिकोज विभागाचे जिल्हा प्रमुख डॉ. संजय सोनटक्के, तसेच कर्मचारी आघाडीचे जिल्हा सचिव श्री नवनाथ काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यासाठी हार्दिक स्वागत करून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments