पूण्यश्लोक न्यूज..
निवडणूका आल्या किंवा मोर्चे अनं आंदोलन चालू झाली की विधानमंडळात आणि मंत्रिमंडळ बैठकात योजनांचा पाऊ
स करणारं सरकार आणि भोळी धनगर जमात!
योजनांच्या पाऊसातील मेंढापाळांना चराई अनुदान योजना
🔖🖇️ काय आहे योजना
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्रमांक: पविआ - 1019 / प्र. क्र. 216 / पदुम-3 (दिनांक 16 सप्टेंबर 2019) नुसार, राज्यातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांसाठी चार महिन्यांच्या (जून ते सप्टेंबर) कालावधीसाठी प्रतिमाह रु. 6000/- (एकूण रु. 24000/-) अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर योजना ही संपूर्ण महाराष्ट्राला लागू न करता फक्त अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर या 9 जिल्ह्यात लागू केली? दुसऱ्या जिल्ह्यात धनगर किंवा तत्सम जमात राहत नाही का? आणि त्याच्यात मोठी गोची म्हणजे एका जिल्ह्यातील 2000 मेंढापाळानाच या योजनेचा लाभ देणार मग बाकीच्यांनी काय केलंय? ?
बरं हे सगळं ठीक आहे पण 2019-20 या आर्थिक वर्षात घोषित केलेली योजना आणि आर्थिक तरतूद पण आज अखेर 1 रुपयाचे अनुदान माझ्या मेंढपाळ बांधवाला मिळाले नाही. याउलट माझ्या मेंढापाळ बांधवांनी या योजनेला अर्ज करण्यासाठी किमान 100 रुपये खर्च केला आहे (खरं तर 500 पेक्षा जास्त झाला आहे) पण उदहरणासाठी 100 रुपये घेतले आहेत. आणि एका जिल्ह्यात 4000 अर्ज केले तर 4 लाख खर्च एका जिल्हाचा झाला आणि 9 जिल्ह्याचा मिळून 36 लाख रुपये खर्च झाला म्हणजे आमदनी अठन्नी खर्चा रुपैया या म्हणी गत हालत या धनगर जमातीला दिलेल्या योजणांच्यामुळे झाली आहे.
🔴 योजनेचा थकीत निधी 🔴
सरकारच्या योजनेनुसार एका जिल्ह्यात 2000 लाभार्थी आणि एका लाभार्थीला ₹24000 वर्षाला प्रमाणे एका जिल्ह्याचे ₹4 कोटी 8 लाख होतात आणि ही योजना 9 जिल्ह्यासाठी असल्याने त्याला 9 ने गुणले तर ₹43 कोटी 20 लाख होतात फक्त एका आर्थिक वर्षाचे. या योजनेचे पैसे किंवा अनुदान म्हणा गेल्या पाच वर्षांपासून थकीत आहे म्हणजे ₹43 कोटी 20 लाख एका वर्षाचे गुणिले 5 वर्षे केले तर एकूण ₹216 कोटी रुपये निधी वितरित केला गेला नाही मग हा आमचा मेंढापाळांचा हक्काच्या निधीवर डल्ला मारतंय तर कोण?
हीच योजना संपूर्ण महाराष्ट्राला लागू केल्यास म्हणजे 34 जिल्ह्यासाठी (मुंबई आणि मुंबई उनगर वागळता) तर या अनुदानचा आकडा हा *₹816 कोटी* इतका होतो आणि आम्ही योजना फक्त कागदावर बघून खुश होतो आणि पक्षाची आणि नेत्यांची पूजा, आरती अनं जप करतो.
बघा बांधवांनो विचार करा आपला वाटा कुठं आहे? ?अनं कोण खातंय? ?
आमच्या मागण्या काय आहेत
1. संपूर्ण महाराष्ट्रात योजना लागू करावी व 9 जिल्ह्यांच्या मर्यादेतून मुक्त करावे.
2. 2000 लाभार्थ्यांची मर्यादा हटवावी व सर्व पात्र मेंढपाळांना लाभ मिळावा.
3. 2019 पासून 5 वर्षांचा प्रलंबित निधी वाटप करावा.
4. योजनेची माहिती जाहीर करून पारदर्शक अंमलबजावणी करावी.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👤 बिरू कोळेकर
📲 9762646663
#धनगर #dhangar #मेंढपाळ

Post a Comment
0 Comments