Type Here to Get Search Results !

गुणवान बनण्यासाठी व्यक्तीमध्ये ही विशेषता हवीच . बाजीराव चौरे

..पूण्यश्लोक न्यूज..

   


                              


       स्वतःमध्ये विशेष गुण असावे असे व्यक्तीला वाटत असते. त्यातही इतरांपेक्षा आपल्यामध्ये जास्तीचे गुण असावे. अशी सुद्धा इच्छा व्यक्ति व्यक्त करत असतो म्हणून तशी धारण सुद्धा करत असतो. आपण गुणवान बनावे यासाठी फक्त विचार करून चालत नाही किंवा इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी आपल्याला विशेष काही गोष्टी करणे अतिशय आवश्यक असते. या विशेष गोष्टी केल्या तरच व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने गुणवान होऊ शकतो. 

         व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. कारण एकेक क्षण किंवा एक एक मिनिट जसा ही समोर जातो तसाच व्यक्तीच्या जीवनामध्ये क्षण किंवा मिनिट कमी होऊन जात असतो आणि गेलेला वेळ आपण परत आणू शकत नाही. म्हणून वेळेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. या वेळेला ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून जे आपण ठरवतो ते वेळेत करणे गरजेचे आहे. नाहीतर वेळ आपल्या हातून निसटून गेल्याशिवाय राहत नाही. 

        म्हणून व्यक्तीने गुणवान व्हायचे असेल तर काय करावे ?हा निश्चितच आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे वेळेचा सदुपयोग करणे होय. प्रत्येक क्षणाचा, मिनिटाचा आपल्या जीवनात उपयोग करणे होय. एकेक क्षण, एक एक मिनिट वाया जाऊ न देता त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी आपण कसा करून घेऊ शकतो ? तर यावर विचार करणे आणि त्या पद्धतीने कार्य करणे होय.

      व्यक्तीला जर धनवान बनायचे असेल तर व्यक्ति नक्कीच काय करतो ? व्यक्तीला वाटत असते की, आपल्याकडे संपत्ती असावी तर व्यक्ती संपत्तीचा विचार करतो आणि त्यासाठी काय करता येईल याचे नियोजन सुद्धा करतो. व्यक्तीला संपत्ती हवी आहे, व्यक्तीला धन, दौलत हवी आहे तर एक एक पैशाचे नियोजन व्यक्ती करत असतो. एक एक पैसा नियोजनबद्धरीत्या वापरत असतो. एक एक पैशाचा संग्रह करत असतो. 

      एकेक पैसा कुठे वाया जाऊ न देता त्याची मूल्य जाणतो व त्याचा संग्रह दिवसेंदिवस वाढवतो. म्हणजे व्यक्ती त्याचे मूल्य जाणतो. असाच व्यक्ती धनसंपत्तीचा, पैशाचा संग्रह जेव्हा करतो आणि काही कालांतराने काही वर्षातच व्यक्तीकडे मोठी संपत्ती ही जमलेली आपल्याला दिसून येते.

        व्यक्तीला धनवान व्हायचे आहे, संपत्तीवान व्हायचे आहे तर व्यक्तींनी काय केले ? तर एक एक पैशाचे मूल्य जाणले आणि त्याचा संग्रह केला. अशाच पद्धतीने आपल्याला गुणवान व्हायचे आहे तर काय करावे लागेल ? त्यासाठी आपल्याला एकेक क्षणाचा उपयोग करून घ्यावा लागेल. एकही क्षण असा वाया जाऊ नये असा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. जेव्हा आपण असा प्रयत्न करू तर नक्कीच काही दिवसांमध्ये आपल्याला लक्षात येईल की, आपल्याकडे चांगले गुण वाढत आहे. आपण गुणवान होत आहोत. या गुणांचे सुद्धा धनासारखेच आहे. जसजसे गुणांवर आपण काम करायला लागतो आणि वेळेला जाणून त्यावर कार्य करतो तर नक्कीच एकेक गुण आपला वाढत जात असतो. 

      एकही क्षण आपला वाया न जाता त्याचा उपयोग आपल्यामध्ये गुण संवर्धनासाठी आपण करत असतो. असे पायरी पायरीने जे काही आपण करत जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की, नक्कीच आपल्यामध्ये गुण वाढत आहे आपण गुणवान बनत आहोत. म्हणून एकही क्षण न दवडता प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण गुणवान बनण्यासाठी केला तर नक्कीच आपले जीवन खूप चांगले, उत्तम आणि यशस्वी होते, आनंददायी होते.    

      


Post a Comment

0 Comments