पूण्यश्लोक न्यूज
समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष लेख
लोकशाहीर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती त्यानिमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे.हे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालबाई होते.जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.अण्णाभाऊंनी दोन विवाह केले.त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे आणि दुसरी पत्नी जयवंता साठे होत्या. त्यांना तीन अपत्ये होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता.हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा,कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले.अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली.त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.त्यांनी पोवाडे,गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार गरीब जाणते पर्यंत पोहोचवले.त्यांना लोकशाहीर पदवी दिली.त्यांनी मराठीत भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले.मुंबई, मराठवाडा, विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.साठे पहिल्यांदा कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले.याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते.ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार,भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते,जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती.आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये,ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला.इ.स.१९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हणले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले.या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे,जिला इ.स.१९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे.साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे,ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक,रशियातील भ्रमंती,१२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.
साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो,आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला.त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला..त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हणले आहे.आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या थोर महामानवाच्या जयंती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.
पवन थोटे,यवतमाळ ९४०४५२६७७७


Post a Comment
0 Comments