Type Here to Get Search Results !

तब्बल अकरा वेळा आमदार एसटी ने प्रवास करणारे . स्व गणपतराव देशमुख

 संपादकीय..

पूण्यश्लोक न्यूज..



गणपतराव देशमुख (१० ऑगस्ट १९२६ - ३० जुलै २०२१) हे एक भारतीय राजकारणी होते. महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने "आबासाहेब" म्हणत. समानतेच्या तत्त्वांसह ते आदर्श व्यक्ती मानले जायचे. शेतकरी आणि कामगारांकडून त्यांना "भाई" म्हणले जाते. गरीब, महिला, मागासलेले, शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक लढाया लढल्या.

शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी होते. सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२पासून अनेक दशके ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळालेल्या गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून अकरा वेळेस निवडून आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला.[२] २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला.


राष्ट्रवादी काँग्रेसने गणपतराव देशमुख यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच निवडून दिले. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.[१]


आमदार असताना एसटी ने प्रवास करताना चे देशमुख
एसटी ने प्रवास करताना चे देशमुख 




गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. ३० जुलै २०२१ रोजी त्यांचे निधन झाले


Post a Comment

0 Comments