Type Here to Get Search Results !

पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण..

वृक्षारोपण कराना मान्यवर...


पूण्यश्लोक न्यूज..

विदर्भ..

यवतमाळ..

पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २३० व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वर्षांपूर्वी सांगितलेले वृक्षलागवाडीचे महत्व लक्षात घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक म. फुले चौक,आझाद मैदान समोर,यवतमाळ येथे बुधवार दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० करण्यात आले होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिवभक्त असल्यामुळे शिवाला प्रिय असलेल्या बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,यावेळेस समाजाचे नेते श्रीधरकाका मोहोड,डॉ.रमेश महानूर, डॉ.अनुज चिंचे यांनी मातेला वंदन करून बेलाच्या झाडाचे वृक्षारोपन केले,या कार्यक्रमाकरिता शोभा पुनसे, शारदा थोटे,वंदना राठोड, सुरेश भावेकर,पवन थोटे, चारुदत्त पुनसे आदी समाज बांधव भगिनी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते,कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळ यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments