🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
पूण्यश्लोक न्यूज...
अत्यंत धक्कादायक! वेदनादायक! दुःखद!
IMA महाराष्ट्र राज्य मा. अध्यक्ष,
महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच राज्य पदाधिकारी,
कळंब परीसरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, रेल्वे कृती समीती अध्यक्ष
सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते,
सामाजिक जाण असलेले,
कळंब शहरातील विविध विषयांवर तळमळीने काम करणारे डाॅ. रामकृष्ण लोंढे सर यांचे आज सकाळी सहा वाजता प्रवासा दरम्यान मुंबई येथे त्यांचे अकस्मात निधन झाले.
शनिवारी त्यांनी तुळजापूर चे आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांनी कळंब येथे बोलावलेल्या विविध संघटना व नागरीकांच्या बैठकीत शहविकासाच्या संदर्भातील विविध महत्वपूर्ण मूद्दे त्यांनी आग्रहाने मांडले.
समाजाच्या आरोग्य विषयक वाटचालीत त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे..
धनगर समाजाच्या एसटी आरक्षना संदर्भात व विविध कार्यक्रम आयोजित करुन समाजाला एकत्र करत सर्व सामान्य मेंढपाळ यांच्या मुलांची गुणवत्ता पाहून त्यांचा सत्कार करण्यासाठी ते सतत धावपळ करत असतं.
डॉ साहेबांच्या या अचानक जाण्याने धनगर समाजातील एक अनुभवी नेतृत्व आज आपल्यातून निघून गेल्याने समाजाची मोठी हाणी झाली आहे....
स्व.डॉ रामकृष्ण लोंढे सर यांना पूण्यश्लोक न्यूज परीवार व अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच च्या वतीने जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली ....
🙏

Post a Comment
0 Comments