Type Here to Get Search Results !

१९५८ च्या दिल्ली दौऱ्यातील गजनृत्य कलाकार हरपला

 पूण्यश्लोक न्यूज..

.                 यशवंत कोळेकर यांचे निधन




१९५८ च्या दिल्ली दौऱ्यातील गजनृत्य कलाकार हरपला


आरेवाडी :- येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व यशवंत बाळू कोळेकर (कवलकर) यांचे वार्धक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. 

       यशवंत कोळेकर यांना सर्वजण तात्या म्हणून ओळखत असत. ते वाढत्या वयामुळे मागील काही वर्षांपासून आजारी होते. अखेर त्यांनी आज दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आरेवाडीकरांच्या दिल्ली दौऱ्यातील अखेरचा तारा निखळला. त्यांनी आयुष्यभर शेती, शेतीपूरक व्यवसाय केला. तसेच ते एक उत्कृष्ट गजनृत्य कलाकार होते. सन १९५८ मधील कलाकारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांचा सहभाग होता. या दौऱ्यातील हयात असलेले ते शेवटचे कलाकार होते. तात्यांच्या जाण्यामुळे दिल्ली गाजविलेला एक कलाकार आपल्यातून निघून गेला, अशा भावना काहींनी व्यक्त केल्या. 

       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. यशवंत कोळेकर यांना सन २०१७ मध्ये संस्कृती संवर्धन पुरस्कार मिळाला होता.

Post a Comment

0 Comments