संपादकीय...
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला.
पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे आहे पण तेच जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलिस अत्याचार वाढत आहे.
या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. या पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे, नाही तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली. आधी, कोणी दुर्लक्ष केले, या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही.

Post a Comment
0 Comments