पूण्यश्लोक न्यूज..
कळंब ता २८ थोर समाजसुधारक, सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यवसायिक कृषी उद्योग व साहित्य क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे असामान्य व्यक्तिमत्व, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १७५ व्या स्मृती दिनानिमित्त कळंब तहसील कार्यालयासमोरील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले चौक येथे सुशोभीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.समितीचे अध्यक्ष श्री तुळशीराम माळी, सचिव तथा राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस श्री संतोष भोजने यांच्या सह बिभीषण यादव,धिरज दुधाळ,प्रेमचंद गोरे, सचिन डोरले, दत्ता माळी, डॉ अशोक शिंपले, श्री जयपाल शिंदे, श्री कोयले सर, श्री देशमुख साहेब, सिद्धेश्वर सातव इ फुले प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments