.पूण्यश्लोक न्युज नेटवर्क .
कळंब येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला तालुक्यातील शाळांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता .
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थींना बक्षीस वितरण पूण्यश्लोक न्युज नेटवर्क मान्यवरांच्या हस्ते गुरवार दि 29 मे रोजी जय भवानी फंक्शन हॉल परळी रोड कळंब येथे सकाळी 9.30मी आयोजित करण्यात आला आहे यामध्ये दहावी बारावी मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचाचे कळंब तालुका अध्यक्ष संतोष घाटूळे व आयोजक टीम तर्फे करण्यात आले आहे .



Post a Comment
0 Comments