बाजीराव चौरे,
.सहसंपादक पूण्यश्लोक न्युज नेटवर्क.
कळंब तालुक्यातील पूण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे आजोळ असलेल्या चोराखळी येथे त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त होळकर शाहिचे गाढे अभ्यासक प्रा डॉ यशपाल भिंगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सव समीती चोराखळी च्या वतीने यशपाल भिंगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील मुलींनी आपले अहिल्यादेवी विचार व्यक्त केले.
यानंतर प्रमुख वक्ते डॉ यशपाल भिंगे यांनी यावेळी बोलताना म्हणाले की धनगर समाजाने आपसातले पोट शाखेतील मतभेद मीटवून आपण सगळे एकच आहोत. अहिल्यादेवींना मानत असाल तर मी फक्त धनगर आहे असा संकल्प आजपासून करा.मुलांना उच्च दर्जा चे शिक्षण देउन जबाबदार नागरीक बनवा पण, आज सर्वांधीक व्यसनाधीनता ही धनगर समाजात आहे .मुलं व्यसनी बनणार नाहीत असे संस्कार त्यांना लहानपणापासूनच द्या, अहिल्यादेवी चा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कसल्याही संकटाला सामोरे जाण्याची तकात आपल्यात निर्माण होईल मल्हारराव होळकर यांनी महिलांना जे स्वातंत्र्य दिले आपणही आपल्या घरातील महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे महिला काय करु शकताता हे अहिल्यादेवींनी जगाला दाखवून दिले आहे. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
सरतेशेवटी विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रामकृष्ण लोंढे,प्रा सोमनाथ लांडगे, सरपंच मिराताई सोनटक्के यांच्या सह धनगर समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या व्याख्येन मालेला आपली हजेरी लावली होती..


Post a Comment
0 Comments