मुख्य संपादक
कळंब तालुक्यातील ईटकूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ह.भ.प बाबुराव महाराज देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डिजे ला फाटा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. व शेवटी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प लाखे महाहाराज,ह भ प बाळासाहेब माने, बालाजी आण्णा आडसुळ,सचिन गंभिरे, अभिषेक गुजर, मोहरबाई कस्पटे लक्ष्मण आडसुळ, हरिदास पावले, अभयसिंह आडसुळ, बिभीषण देसाई, देविदास गायके, सुरेश लोंढे, नानासाहेब कवडे, अशोक शिंपले, रितेश लगाडे, आकाश दाणे, मारुती गायके जयदेव गंभिरे,बंडु बावळे,किरण आडसुळ हनुमंत आडसुळ, बाळासाहेब माने, , सतिश कस्पटे, सुशिल कस्पटे,श्रीराम वाघमारे गणेश गिरे आकार दाने,दादा कस्पटे सुशिल कस्पटे, प्रमोद गिरे, अर्जुन गिरे राजेंद्र घाटूळे,हनुमंत कस्पटे, केशव कस्पटे, पत्रकार बालाजी देसाई पत्रकार संतोष गिरे श्रीमंत कस्पटे दिलीप कस्पटे चंद्रकांत कस्पटे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
डि जे ला फाटा देत टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक वारकरी दिंडी ने गावकऱ्यांचे वेधले लक्ष
माऊली वारकरी शिक्षण संस्थेने च्या बाल वारकऱ्यांचे ईटकूर करांनी केले कौतुक.


Post a Comment
0 Comments