पूण्यश्लोक न्यूज.
संपादक.
अजित गायके 9860198220
नागपंचमी हा हिंदू सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो.या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.हिंदू धर्मात नागांना विशेष महत्त्व आहे; शेषनाग भगवान विष्णूंचे आसन आहेत तर वासुकी नाग भगवान शिवाच्या गळ्यात शोभतात.या दिवशी लोक उपवास करतात,घराच्या भिंतीवर नागांची चित्रे काढतात आणि त्यांना दूध,फुले,लाडू अर्पण करतात. सर्पांना मारणे किंवा त्रास देणे अशुभ मानले जाते.महाभारतातील जनमेजयाची कथा आणि श्रीकृष्ण-कालिय नाग कथा यासंबंधी लोकप्रिय आहेत.हा सण पर्यावरणातील सर्पांचे महत्त्व अधोरेखित करून सर्पसंवर्धनाचा संदेश देतो.श्रावण महिना सुरू झाला की,अनेक सण साजरे केले जातात.श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे.नागपंचमीची माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं.तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो.असं मानलं जातं की,या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात.या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली.ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं.पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे.यंदा नागपंचमी मंगळवार दि.२९ जुलै २०२५ या तारखेला येत आहे.नागपंचमीची तिथी पहाटे ५.१४ या वेळेला २९ जुलै ला सुरू होत आहे.यानुसार नागपंचमीच्या पूजाविधीसाठी आपल्याला साधारण अडीच तासाचा वेळ मिळणार आहे.हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा-अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरूवात झाली.तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात.नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे.नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे.तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे.याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते.खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे.ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे.तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे.कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही.तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच,पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात.कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे.कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात.त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगितलं जातं.शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे.परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते.या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो.श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरं केलं जातं.
पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं वाचल्यास आपल्याला कळेल की,फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे.नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो.नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे.
हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी, वनस्पती,एवढचं काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं.प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज,पर्व, उत्सवांचं नातं हे धर्माशी जोडलं आहे.एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणांशीही जोडण्याचं काम करतात.याचनुसार नागाला दैवीप्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे.
नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं आणि पूजेबाबतचा एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाशीही निगडीत आहे.याबाबतची कालियामर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे.या आख्यायिकेनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंस राजा कालिया नामक नागाला पाठवतो.पहिले हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभयीत करतो. मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदीकिनारी खेळत असतो तेव्हा त्यांचा चेंडू नदीत पडतो.जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो तेव्हा कालिया नाग आक्रमण करतो.मग श्रीकृष्ण त्याचं पराभव करतो.मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तिथून निघून जातो.कालिया नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमी स्वरूपात साजरं केलं जातं.नागपंचमीला भावाचा दिवस किंवा भैया पंचमी असंही संबोधल जातं.बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात.फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो.तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात.महाराष्ट्रात आजही मुली-सुना झाडांना झोके बांधून या दिवशी गाणी म्हणतात. नागाची पूजा करण्याआधी हाताला मेंदी लावतात.तसंच या दिवशी सुनांना माहेरीही पाठवण्याची प्रथा प्रचलित आहे.
पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टीचं कटाक्षाने पालन केलं जात असे.ज्यामध्ये त्या दिवशी शेतात नांगर न चालवणे,हत्यारं न वापरणं.पण आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते.तसंच या प्रतिमेला दूध,लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो.आजही बऱ्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दानही केलं जातं.नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची प्रथा आहे. काही काळांपर्यंत नागपंचमीला गारूडी हे साप घेऊन येत असत आणि सापांना दूध पाजले जात असे. आता मात्र संशोधन आणि लोकजागृतीमुळे या चुकीच्या प्रथांना विराम मिळाला आहे.तसंच नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये,काहीही कापू नये,तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जात असत.आपल नागांवर खरंच श्रद्धा असल्यास नागासोबतच शिवलिंगाला दूधाचं स्नान घालू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दूधाचं दानही करू शकता.कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी ठरते. पवन थोटे, यवतमाळ ९४०४५२६७७७

Post a Comment
0 Comments