पूण्यश्लोक न्यूज
ज्यांनी आपल्या सोबत वाईट केले त्यांच्यासोबत काय करावे
सर्वच व्यक्ती आपल्या सोबत चांगलेच वागतील असे होत नाही. काही काही व्यक्ती आपल्या सोबत खूप चांगले वागत असतात, प्रेमाने वागत असतात. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, दाखवत असतात. मात्र काही व्यक्ती आपल्या सोबत खूप क्रूरतेने, वाईटपणे वागत असतात.
अशी व्यक्ती आपल्या समोर आल्या की, आपल्याला त्यांचा खूप राग येतो. यांच्याबाबत द्वेष निर्माण होतो. त्यांच्यासोबतच आपणही त्यांचे वाईट करावे असे वाटत असते. ज्या पद्धतीने आपल्याला त्यांनी वागणूक दिली तसेच आपणही त्यांच्या सोबत वागावे. असा विचार आपण करत असतो. कोणीही आपल्या सोबत वाईट वागले किंवा चुकीचे वागले त्यांच्यासोबत असे करणे योग्य आहे का ? हा मुळातच महत्त्वाचा प्रश्न आहे.
अशाच पद्धतीने इतर व्यक्ती आपल्या सोबत जर वाईट वागत असेल तर त्यांच्याशी ते जसे वागतात तसेच वागू नये. फार विचार करून आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी वर्तन केले पाहिजे. आपण लक्षात घेतले पाहिजे की, आपण त्यांच्याशी वागताना आपण तर बरोबर आहे ना ! आपल्यात कुठली तरी वाईट भावना, विचार असे काही नाही ना ? असा विचार आपण केला पाहिजे. आपल्यात त्यांच्याविषयी काही बदला घेण्याची तर भावना नाही ना ? हे आधी तपासले पाहिजे.
कारण बरेचदा आपण बदला घेण्याचाच विचार करत असतो. असा जर विचार करत असाल तर आपण नक्कीच थांबले पाहिजे. हे करणे कदापि योग्य नाही. कारण जसे कर्म आपण करतो. तसेच फळ आपल्याला मिळत असते. हा नियम आपण लक्षात ठेवला की, आपले खूप चांगले होण्यास सुरुवात होते.
समोरची व्यक्तीने आपले वाईट केलेले आहे पण आपण तसा विचार करत नाही. आपल्याकडून वाईट कर्म घडत नाही. असा जर विचार आपण करत असलो तर नक्कीच भविष्यामध्ये आपले खूप चांगले घडून येईल.
मात्र समोरच्या व्यक्ती सारखेच बदला घेणारे आपण झालो तर नक्की आपल्या सोबत सुद्धा वाईट घडून येते म्हणून अशा या गोष्टी आपण वेळेवर सोडल्या पाहिजे. जे काही समोरच्या व्यक्ती कर्म करतात, त्याची शिक्षा त्याला मिळावी. यासाठी आपण काहीही करू शकत नाही. त्याने आपल्या बाबतीत वाईट कर्म केले तर त्याच्या कर्माची फळे ही त्याला नक्कीच मिळणार. मात्र आपण थोडा संयम ठेवला पाहिजे आणि फळ मिळण्याचे हे वेळेवर सोपवले पाहिजे.
समोरच्या व्यक्ती आपल्या बाबत किती वाईट विचार करत असेल तर नक्कीच आपण तसा विचार न करता त्याचा परिणाम म्हणून जे काही होईल ते वेळेत घडून येईल असेच म्हणून आपण शांत रहाणे हे केव्हाही चांगले. वेळ आल्यानंतर आपापल्या कर्माचे फळ हे बरोबर मिळत जाते.
म्हणून आपल्याकडून वाईट कर्म न घडू देणे याबाबतच आपण जागरूक असायला पाहिजे आणि वाईट कर्म घडून येत असेल तर त्यांना थांबवून शांत राहून चांगले कर्म करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनात बदल्याची भावना निर्माण होणार नाही. जीवनात आपण चांगलेच करू शकलो हीच सद्भावना निर्माण होते. यातून जीवन जगण्यातील समाधान मात्र आपल्याला नक्की मिळते.

Post a Comment
0 Comments