मुरुड येथे शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक संपन्न
July 16, 2025
0
बाजीराव चौरे सहसंपादक...
लातुर
लातुर : तालुक्यातील मुरुड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी मध्ये किंवा स्वतंत्र शिवसैनिकांनी लातूर ग्रामीण साठी तयारीला लागावे असे आदेश शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले
मुरुड प्रतिनिधी दि.१६ आज सध्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्याचा अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रभाग रचनेची धामधूम पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था साठी आपल्या आपल्या परीने बैठका संपन्न होत आहेत त्यामध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याही बैठकी चार धुमधडाका संपूर्ण महाराष्ट्र भर शिवसेना नेते शिवसेना उपनेते शिवसेना संपर्कप्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख शिवसेना सह संपर्कप्रमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे त्याच अनुषंगाने आज मुरुड येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी शिवसेना नेते व संभाजी नगरचे मा खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मुरुड येथील शासकीय विश्रामगृह मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे प्रस्ताविक बाळासाहेब डोंगरे यांनी केले यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचे मार्गदर्शन झाले यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या बैठकीमध्ये संबोधताना शिवसैनिकांना व महिला संघटनाना कुठला विषय घेऊन आपल्याला निवडणुकीस उतरायचं आहे त्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्र मध्ये खोटं बोलणाऱ्या सरकार फसवेगिरी सरकार मिंदे चे सरकार यांचा खोटारड्या चेहरा असणाऱ्या भाजप व मिंदे सरकार कडून महिलांची व शेतकऱ्यांची घोर फसवणूक करण्यात कशी आली आहे व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना महाराष्ट्रातील नागरिकांना महिलांना व शेतकरी बांधवांना एका मिनिटांमध्ये न उशीर करतात सरसकट शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले होते यानंतर कोरोना सारख्या भयंकर संकटामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राला आपल्या घरच्यासारखं समजून कित्येक तरी जीवन वाचण्याचे काम व अन्न पाणी वस्त्र निवारा त्या पुरविण्याचे काम शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मा लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून झाले आहे हे गावातील वाड्या वस्तीवरील सर्वसाधारण नागरिकांना महिलांना पटवून द्या तसेच सध्याच्या शासनाने लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा वादा केला होता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते असे बरेच 18 वादे या खोटारड्या भाजप सरकारने व मेंदे सरकारने केले होते त्याचं काय झालं हे गावोगाव गल्ली गल्ली जाऊन शाखाप्रमुख शहर प्रमुख विभाग प्रमुखांना हे जनतेला पटवून सांगा व जनतेला सध्या खोटारडे भाजपा आणि मिंध्या खरा चेहरा दाखवून त्यांच्या चेहरा फाडा असे आवाहन करण्यात आले त्यामुळे खोटारड्या भाजप मिंदे सरकारच्या विरोधात सध्या जनतेचा कौल आहे त्यामुळे आपण सर्वजण मिळून सर्वांना एकजूट करून पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवायचं आहे असा निर्धार करून लातूर ग्रामीण मधील भागांमध्ये महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडी सोबत लढू अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धोरणानुसार एकट लढू असा निर्धार शिवसैनिकासमोर शिवसेना नेते व मा खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांनी केले आहे यावेळी शिवसेनेचे नवनवीन जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी संपर्कप्रमुख नामदेव चाळक एस के मुरूळीकर शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे तालुकाप्रमुख कैलास पाटील स्वप्निल नाडे गोकुळ चांडक दत्ता गोरे महादेव काळे प्रंकाश भाऊ अंधारे उप तालुकाप्रमुख आकाश तिरुके संजय हराळकर शिवाजी गडकर विष्णू घुटे विशाल शिंदे विष्णू शिंदे नागेश्वर कापसे कृष्णा मेटे सतीश जाधव विष्णू गायकवाड बाळासाहेब खराडे रवी सूर्यवंशी दत्ता पंपु शिंदे बलभीम मधुरकर सुरेश भंडारी वसंत शिंदे बाबू धनगर माचवे शरद घनगावकर तसेच मुरुड मधील आज माझी शिवसैनिक यावेळी मुरुड शासकीय विश्रामगृह याठिकाणी उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments