संघर्षात तुझ कोणीच नसतं रे मित्रा.,
July 14, 2025
0
पूण्यश्लोक न्यूज..
संघर्षात तुझं कुणीचं नसतं रे मित्रा...
संघर्षात तुझं कुणीचं नसतं रे मित्रा...
लोक पाहतात यशाची मिरवणूक,
तु थोडीही ठेवू नको कष्टाची कमी आणि झुंजेची तमा...
घामाने ओले कपडे
कुणाला भावत नाहीत,
ते पाहतात केवळ
सुवर्ण पदकाचे कडं...
आश्वासनं देणारे असतात हजार,
पण कठीण वेळेला येतो खरा आधार...
संघर्षात पडतोस जेव्हा एकटाच,
तेव्हाच घडतोस,
होतोस यशाचा जातीवंत हिरा.
म्हणून झुंजत रहा,
न थांबता पुढं वाटचाल कर,
यश तुझंच होईल,
काळच सांगेल 'तू खरा वीर'
प्रा. सोमनाथ लांडगे,
श्री साई श्रध्दा एज्युकेशन

Post a Comment
0 Comments