भविष्य माझं मीच लिहिलंय रे लेखक प्रा सोमनाथ लांडगे..
July 19, 2025
0
हात माझा आता नको रे तू बघू!
आता शब्दांनी स्वप्नं नको रे विकू!!
भाकीतांच्या गुंत्यात, जीवन माझ अडतं!
सत्याच्या शोधातच खरे सुख सापडतं!!
रेषा पाहू नको माझ्या तळहातातली!
घामानं घडवली वाट मी काळातली!!
ग्रह नक्षत्रांचे नको रे ते आता डोंगर!
प्रश्न तुडवले पायदळी, केली मात संकटांवर!!
सांगतोस शनी, मंगळ, राहू मला तू भाऊ!
माझ्या श्रमाची किंमत तुला काय रे ठाऊ?
आता भविष्य माझं मीच लिहिलंय रे!
हातात नाही, डोळ्यात श्रमाचे निखारे!!
नशिबापेक्षा श्रमाला मान रे मी देतो!
माझ्या पावलांवरच विश्वास ठेवतो!!
झरे आटले तरी मेघ रे झेलतो!
माझ्याच आभाळाखाली सूर्य मी उगवतो!!
✍️ प्रा. सोमनाथ लांडगे,
श्री साई श्रध्दा, धाराशिव.
मो. 9422941929

Post a Comment
0 Comments